April 15, 2025 3:36 PM April 15, 2025 3:36 PM

views 13

भारतीय प्रशासन सेवेच्या २०२३ साली निवड झालेल्या सनदी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपतींची घेतली भेट

भारतीय प्रशासन सेवेच्या २०२३ साली निवड झालेल्या सनदी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर चालवलेल्या समाजकल्याण आणि विकासकामांमुळे राष्ट्रीय उद्दिष्टपूर्तीत मोठी मदत होत असते. अधिकाऱ्यांनी आपले हक्क आणि कर्तव्य यांच्यात समतोल साधून हक्कांचा वापर जबाबदारी पार पाडण्यासाठी करावा असा सल्ला राष्ट्रपती मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना दिला.