November 15, 2024 2:24 PM November 15, 2024 2:24 PM

views 14

जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जमुई इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने ६ हजार ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पीएम-जनमन योजनेअंतर्गत बांधलेल्या ११ हजार घरांचा गृहप्रवेशही त्यांनी यावेळी केला. तसंच, त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाचा प्रारंभ करताना बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आणि समृद्ध आदिवासी वारसा तसंच संस्कृतीवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. यासोबत त्यांनी दोन आदिवासी स्वातंत्...