October 18, 2025 3:10 PM

views 61

बीडमध्ये जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपोषण

आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या जमातींना जात प्रमाणपत्र मिळावं, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी आज उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माजलगाव आणि बीडचे जिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली.  

December 9, 2024 4:46 PM

views 85

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर झाले असल्याचं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं. आदिवासी विकास निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या या निधीतून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं.  

November 15, 2024 12:20 PM

views 50

देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचं योगदान महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं प्रतिपादन

आदिवासी समुदायाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज देशभरात जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी काल देशवासीयांना संदेश दिला. देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचे योगदान महत्वाचे असून सध्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असे राष्ट्रपती द्रौपदी मुर...