March 9, 2025 3:27 PM March 9, 2025 3:27 PM

views 19

मुंबईची आर्थिक स्थिती भाजपा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईची आर्थिक स्थिती भाजपा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोप केला आहे. तसचं, गुजरातमध्ये गिफ्ट सिटीसारख्या सुविधा मुंबईला मिळाव्यात, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. मुंबई इथं एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईतला कोस्टल रोड, अटल सेतू आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमधल्या विलंबावरही ठाकरे यांनी टीका केली. तसंच, मुंबई शहरातल्या आरोग्य सेवेवरही त्यांनी निराशा व्यक्त केली.

February 13, 2025 3:15 PM February 13, 2025 3:15 PM

views 11

आदित्य ठाकरेंनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. ही भेट मैत्रीपूर्ण भेट असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे यांनी काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. या दोघांमध्ये निवडणूक आयोगावर ईव्हीएम संदर्भात केलेल्या आरोपांबाबत चर्चा झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आह...

November 26, 2024 9:23 AM November 26, 2024 9:23 AM

views 24

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आली. विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल पत्रकारांना दिली.

October 16, 2024 3:20 PM October 16, 2024 3:20 PM

views 17

आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत या सरकारने आपण काहीतरी जनतेसाठी देत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र खरा फायदा अदानी समूहाला करन दिला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. धारावीमध्ये ५४० एकरचा कुर्ला येथे २१ एकर, मुलुंड, भांडूप आणि कांजुरमार्ग असा एकत्रित २५५ एकर, मढमध्ये १४० एकर, देवनारमध्ये १४० एकरचा भूखंड अदानी समूहाला मिळाला आहे, त्याचा शासन आदेश निघेपर्यंत निवडणुका जाहीर झाल्या नाहीत असं ते म्हणाले. मविआ सत्तेत आ...

October 11, 2024 7:31 PM October 11, 2024 7:31 PM

views 18

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार घाईत निर्णय घेत असल्याची आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार घाईघाईत निर्णय घेत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्याप पूर्ण तयार झालेलं नसताना त्यावर विमान उतरवण्याचा स्टंट मुख्यमंत्र्यांनी केला, अशी टीका ठाकरे यांनी केली. नवी मुंबई विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव मविआ सरकारच्या काळात दिले होते, मात्र त्यावर अजूनही निर्णय का घेण्यात आला नाही, असा प्रश्नही ठाकरे यां...

August 26, 2024 8:38 AM August 26, 2024 8:38 AM

views 17

राज्यात सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचं आदित्य ठाकरे यांचं आवाहन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्यावर असून, काल त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्न करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बरोजगारी, महिला सुरक्षा यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली. आदित्य ठाकरे आजही जिल्ह्यातल्या काही तालुक्यांचा दौरा करून शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत.

July 29, 2024 7:53 PM July 29, 2024 7:53 PM

views 15

मुंबई महानगरपालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेने यावर्षी सहा हजार कोटींच्या निविदा काढल्या, मात्र गेल्यावर्षी निविदा काढलेलं एकही काम झालेलं नसून पालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मागच्या वर्षी निविदा काढलेली किती कामं पूर्ण झाली, ज्या कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात आला होता तो आकारण्यात आला का, असा सवालही ठाकरे यांनी विचारला. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पालिकेनं काम दिल्याचा आरोपही त्यांनी केला. रा...

June 25, 2024 7:30 PM June 25, 2024 7:30 PM

views 19

‘बेस्ट’ बससेवेला आर्थिक सहाय्य करण्याची आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबईतल्या ‘बेस्ट’ बस सेवेला आर्थिक सहाय्य करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रद्वारे केली आहे. गेल्या दोन वर्षांत बेस्टकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. बेस्ट बसची भाडेवाढ करू नये, कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्तीवेतन वेळेवर मिळावं आणि बसच्या संख्येतली नियोजित वाढ तातडीन अमलात आणावी अशा मागण्याही ठाकरे यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.  

June 17, 2024 6:30 PM June 17, 2024 6:30 PM

views 46

वायव्य मुंबई मतदार संघातल्या निकालाला आव्हान देणार – आदित्य ठाकरे

वायव्य मुंबई मतदार संघातल्या निकालाला येत्या एक-दोन दिवसांत न्यायालयात आव्हान देणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलं आहे. अमोल किर्तीकर यांचा पराभव सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाल्याचा आरोप करत मुंबईतल्या पत्रकार परिषदेत अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली.     या मतदार संघातील मतमोजणी सुरू असताना १८  व्या फेरीपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक फेरीमधील मतमोजणीची आकडेवारी जाहीर करत होते. परंतु १९ व्या फेरीनंतर ते बंद केल्याचा दावा...