June 5, 2025 7:18 PM June 5, 2025 7:18 PM

views 12

येत्या १५ दिवसांत ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश- आदिती तटकरे

महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता आदिशक्ती अभियान राबवता यावं याकरिता येत्या १५ दिवसांत ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.   या अभियानाअंतर्गत विविध विभागांमधल्या महिलांच्या समस्या सोडवणे, हुंडा प्रथा थांबवणे, महिलांशी निगडित विविध योजनांबद्दल जनजागृती करणं असा व्यापक उपक्रम राबवला जाणार आहे.