March 12, 2025 8:09 PM March 12, 2025 8:09 PM
5
किरकोळ चलनफुगवट्याचा दर सात महिन्यातल्या निचांकी पातळीवर
फेब्रुवारी महिन्यात किरकोळ चलनफुगवट्याचा दर कमी होऊन ३ पूर्णांक ६१ शतांश टक्क्यांवर आला. सात महिन्यातली ही निचांकी पातळी आहे. हा दर ४ टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेला दिले होते. ही घट अनपेक्षित असल्याचं इक्रा या पतनिर्धारण संस्थेच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ आदिती नायर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत व्याजदरात पाव टक्क्याची घट होण्याची शक्यता बळावल्याचं त्या म्हणाल्या. जानेवारीत...