June 14, 2025 7:48 PM June 14, 2025 7:48 PM

views 6

UIDAI नं आधार कार्ड निःशुल्क अद्ययावत करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार कार्ड  निःशुल्क अद्ययावत करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२५ पर्यंत होती. आता ती १४ जून २०२६ पर्यंत वाढवली आहे. यूआयडीएआयनं आपल्या अधिकृत एक्स हॅन्डलवर माहिती दिली आहे. ज्या व्यक्तींचे आधार कार्ड दहा वर्षे किंवा त्याहून अधिक जुनं आहे, त्यांना ते अद्ययावत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसं न केल्यास त्या व्यक्तीचं आधार कार्ड रद्द होऊ शकते. आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा असलेले कागदपत्र सोबत नेणं बंध...