May 5, 2025 8:04 PM May 5, 2025 8:04 PM

views 4

अर्थमंत्री सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची घेतली भेट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ५८व्या एडीबी वार्षिक बैठकीत आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. इटलीत मिलान इथे झालेल्या या बैठकीत अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, भारत खासगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करत असून व्यापाराच्या सुलभीकरणासाठी सातत्याने अनुकूल धोरण राबवून नियामक परिसंस्था विकसित करत आहे. या उपक्रमांमध्ये कॉर्पोरेट दर कपात, जीएसटी अंमलबजावणी, स्टार्टअप इंडिया यांचा समावेश होतो, असंही त्या म्हणाल्या.