February 14, 2025 1:17 PM February 14, 2025 1:17 PM

views 20

प्रधानमंत्री अदानींच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरण दडपत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  प्रधानमंत्र्यांना देशात प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते मौन बाळगतात, आणि परदेशात विचारले जातात तेव्हा ती वैयक्तिक बाब असल्याचं सांगतात. मोदी यांनी अमेरिकेतही अदानींच्या भ्रष्टाचारावर पांघरून घातलं आहे, असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

August 12, 2024 1:24 PM August 12, 2024 1:24 PM

views 11

हिंडेनबर्गनं केलेले आरोप अदानी समूहानं फेटाळले

अदानी समूहानंही हिंडेनबर्गनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या समूहावर या अमेरिकन कंपनीने केलेले हे सर्व आरोप काल्पनिक आणि दुर्भावनापूर्ण आहेत, तसच त्यांच्या वैयक्तिक फायद्याच्या दृष्टीने केले आहेत, अशी प्रतिक्रिया अदानी समूहाने दिली आहे. या आरोपांबाबत या आधीच चौकशी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले आहेत, असंही अदानी समूहाने म्हटलं आहे. सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्याविरोधातील हिंडेनबर्ग अहवालाचा भारतीय म्युच्युअल फंड्स संघटनेनं निषेध केला आहे. भारताच्...

July 20, 2024 7:14 PM July 20, 2024 7:14 PM

views 7

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची अदानी समूहाला दिलेली निविदा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीनं निविदा काढावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.   धारावीकरांना त्यांच्या हक्काचं ५०० चौरस फुटांचं हक्काचं घर तिथेच मिळायला पाहिजे, ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं ते म्हणाले. अदानी समूहाला वारेमाप एफएसआय दिला जात असून समूहाला दिलेल्या निविदेत वाढीव एफएसआयचा उल्लेख नाही. धारावीकरांना धारावीतून हाकलून लावण्याचा, नागरी संतुलन बिघडवण्या...