October 15, 2024 11:21 AM

views 9

उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना केंद्र सरकारची मंजुरी

राष्ट्रीय महामार्ग-६३ वर उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या, ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली. या मार्गामुळे उदगीर, मुक्रमाबाद आणि देगलूर शहरातल्या औद्योगिक कृषी-व्यावसायिक उपक्रमांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.