January 28, 2025 7:07 PM January 28, 2025 7:07 PM

views 2

इयत्ता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने लावण्याचा निर्णय रद्द

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने न लावण्याचा शासन आदेश सरकारनं आज प्रसिद्ध केला. पाठ्यपुस्तकांमध्ये लावलेल्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांनी उपयोग केला नाही. त्यामुळं सरकारनं पाठ्यपुस्तकात वह्यांची कोरी पानं लावण्याचा निर्णय सरकारनं रद्द केला. 

January 21, 2025 7:25 PM January 21, 2025 7:25 PM

views 11

सैफ अली खान उपचारांनंतर सूखरुप घरी

चाकू हल्ल्यात जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. १६ जानेवारी रोजी पहाटे सैफ अली खान याच्यावर वांद्रे इथल्या राहत्या घरी चाकू हल्ला झाला होता. हल्लेखोराने त्याच्यावर सहा वार केले होते. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीत घुसलेला चाकुचा तुकडा बाहेर काढला होता.

January 20, 2025 8:13 PM January 20, 2025 8:13 PM

views 1

अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सबळ पुरावा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लाप्रकरणी संशयित आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याच्या बोटांचे १९ ठसे सतगुरू शरण इमारतीत पोलिसांना आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पायऱ्या, खिडकी  आणि अपार्टमेंटमध्ये बोटांचे ठसे आढळले असून हे आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आहेत असं पोलिसांनी सांगितलं.     सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी हा भारतात येण्यापूर्वी बांगलादेशात कुस्तीपटू होता. आपण जिल्हा स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतला होता असं आरोपीने पोलिसांनी क...

January 18, 2025 8:31 PM January 18, 2025 8:31 PM

views 7

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणी एकाला अटक

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी रेल्वे पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्गमधून एकाला अटक केली आहे. दुर्ग रेल्वे स्थानकावरुन त्याला ताब्यात घेतलं. रात्रीपर्यंत मुंबई पोलीस तिथे पोहोचून त्याची चौकशी करतील आणि त्याचा ताबा घेतील.

January 16, 2025 8:25 PM January 16, 2025 8:25 PM

views 14

सैफ अली खानची प्रकृती स्थिर, आरोपीच्या शोधासाठी १० पथकांची स्थापना

अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पहाटे मुंबईतल्या घरी अज्ञात इसमानं त्याच्यावर चाकू हल्ला केला होता. त्यात त्याला ६ ठिकाणी जखमा झाल्या होत्या, त्यातल्या २ जखमा खोल आहेत. त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यात मणक्यातून चाकूचा तुकडा डॉक्टरांनी बाहेर काढला.    या प्रकरणी एका व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण...