August 3, 2025 2:24 PM August 3, 2025 2:24 PM

views 52

अभिनेते माधवन बॉब यांचं चेन्नईमध्ये निधन

तामिळ चित्रपटसृष्टीतले विनोदी अभिनेते माधवन बॉब यांचं काल संध्याकाळी चेन्नईमध्ये निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. त्यांनी कमल हसन, रजनीकांत, अजित, सूर्या आणि विजय यांच्यासोबत काम केलं आहे.   सुमारे ६०० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यात तमिळ प्रमाणेच हिंदी, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमधल्या चित्रपटांचा समावेश होता. त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे सहकारी कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

April 5, 2025 8:23 AM April 5, 2025 8:23 AM

views 9

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; आज मुंबईत अंत्यसंस्कार

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं होतं; मात्र देशभक्त नायक म्हणून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे भारतकुमार हे टोपणनाव त्यांना मिळालं. वो कौन थी, शहीद, रोटी कपडा और मकान, क्रांती, पूरब और पश्चिम, उपकार हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. भारतीय चित्रपटसृष्ट...

October 14, 2024 8:41 PM October 14, 2024 8:41 PM

views 7

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झालेल्या अतुल परचुरेंनी बालरंगभूमीपासूनच अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. रंगभूमीबरोबरच छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी - हिंदी मिळून त्यांनी ४० पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं. काही काळापूर्वी कर्करोगाशी सामना करुन ते त्यातून यशस्वीपणे बाहेर पडले होते. तरुण तुर्क म्हातारे अर्क, वासूची सासू, प्रियतमा, या नाटकातल्या त्यांच्या भूमिका  विशेष गाजल्या. नवरा मा...