August 19, 2025 7:59 PM August 19, 2025 7:59 PM

views 13

ज्येष्ठ चरित्र अभिनेता अच्युत पोतदार यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेता अच्युत पोतदार यांचं काल रात्री ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातल्या स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले.   लष्करातून कॅप्टन म्हणून १९६७ मधे निवृत्त झाल्यानंतर इंडियन ऑईलमधे नोकरीत असताना त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला. मराठी रंगभूमी, दूरचित्रवाहिनी मालिका, आणि चित्रपटांमधे विविध चरित्र भूमिकांमधे त्यांनी ठसा उमटवला. १९८० मधे ‘आक्रोश’ आणि ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ या गाजलेल्या चित्रपटांमधे त्यांनी त्या...