September 15, 2025 10:01 AM September 15, 2025 10:01 AM

views 377

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा आज शपथविधी

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकरणार आहेत. आचार्य देवव्रत यांचं काल अहमदाबादहून मुंबईत आगमन झालं.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. आज सकाळी 11 वाजता आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.