October 18, 2024 3:01 PM October 18, 2024 3:01 PM
8
जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशातल्या नवीन मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर
जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशातल्या नवीन सरकारने आज मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर केलं. त्यानुसार,उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी हे सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि वाणिज्य, खाणकाम, कामगार आणि रोजगार, कौशल्य विकास मंत्री असतील. तर सकिना मसूद यांच्याकडे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण, शालेय तसंच उच्च शिक्षण आणि समाजकल्याण विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. जलशक्ती, वन संधारण आणि पर्यावरण आणि आदिवासी व्यवहार विभाग जावेद अहमद राणा यांच्यावर सोपवण्यात आला आहे. कृषी उत्पादन, ग्रामीण विका...