February 18, 2025 2:50 PM February 18, 2025 2:50 PM

views 9

देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू

पंजाबमधल्या फरीदकोट इथं खासगी बस नाल्यात पडून आज सकाळी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवताना बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.   कुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला ट्रकने धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन गंभीर जखमी आहेत. उत्तरप्रदेशातल्या इटवाह इथं कानपूर-आग्रा रस्त्यावर काल रात्री उशीरा हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...

January 2, 2025 9:59 AM January 2, 2025 9:59 AM

views 3

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 8 जण ठार

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं काल मालगाडी आणि चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन महीला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अन्य एका अपघातात धुळे-सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या महाकाळा फाट्यावर रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त मालवाहू गाडीला चारचाकी वाहनानं पाठीमागून धडक दिल्यामुळं एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हे दोन्ही अपघात देवदर्शनाच्या प्रवासादरम्यान घडले...

October 29, 2024 7:41 PM October 29, 2024 7:41 PM

राजस्थानमधे झालेल्या अपघातात १२ जण ठार तर २५ पेक्षा जास्त जण जखमी

राजस्थानमधे सीकर जिल्ह्यात एका खाजगी प्रवासी बसला झालेल्या अपघातात १२ जण ठार तर २५ पेक्षा जास्त जण जखमी झाले. ही बस सालासर इथून नवलगडकडे जात होती. आज दुपारी बस लक्ष्मणगड इथून जात असताना च्या वेळी बसचालकाचे वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि ती पुलावर आदळली. अपघातातल्या काही जखमीना जयपूर इथं तर, काहींना सीकर इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.    राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचन...

October 8, 2024 9:23 AM October 8, 2024 9:23 AM

views 8

राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील, पुसद-वाशिम मार्गावरील मारवाडी फाट्याजवळ काल सकाळी प्रवासी गाडीला झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. अपघातग्रस्त गाडीतील सर्वजण माहूरगड इथल्या देवीचं दर्शन घेऊन वाशिमकडे येत होते. दूसरा अपघात सोलापूर - सांगली महामार्गावरील, सांगोला तालुक्यातील चिंचोली बायपास इथे घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत आणि जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तुळजाभवानी...