July 10, 2024 3:18 PM July 10, 2024 3:18 PM
13
उत्तरप्रदेश : उन्नाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू, १९ जखमी
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या दुधाच्या टँकरला डबल डेकर बसनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं. मृतांच्या नातेव...