December 29, 2024 4:09 PM December 29, 2024 4:09 PM

views 13

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात भाविकांच्या बसला अपघात

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या भटुंबरे इथं आज सकाळी भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक वृद्ध महिलेचा आणि एका सात वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. ही बस पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने जात होती. या अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

December 20, 2024 6:05 PM December 20, 2024 6:05 PM

views 15

ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघाली होती. या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते.   वाटेत ताम्हिणी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

December 15, 2024 9:35 AM December 15, 2024 9:35 AM

views 8

जालना-सिंदखेडराजा मार्गावर आयशर ट्रक आणि बसच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू

जालना-सिंदखेडराजा मार्गावर आयशर ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १८ ते २० प्रवासी जखमी झाले. नाशिक-नांदगाव डेपोची ही बस जालन्याहून सिंदखेडराजाकडे जात असताना, नाव्हा शिवारात ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

November 15, 2024 7:33 PM November 15, 2024 7:33 PM

views 49

कणकवली बसस्थानकात दोन एसटी बसमध्ये चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्गमध्ये कणकवली बसस्थानकात दोन एसटी बस मध्ये चिरडल्याने एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळं काहीवेळा नागरिकांनी बस वाहतूक रोखून धरली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःकडून मृताच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत दिली. या प्रकरणी दोन्ही बसच्या चालक आणि वाहकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचं निलंबन केलं जाईल, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

November 9, 2024 10:14 AM November 9, 2024 10:14 AM

views 13

चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार

बीड जिल्ह्यात पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सय्यद कुटुंबियांच्या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सय्यद हमीद आणि सय्यद मुदस्सीर या पिता पुत्राचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

November 2, 2024 8:26 PM November 2, 2024 8:26 PM

views 7

ओदिशात झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी

ओदिशातल्या सुंदरगढ जिल्ह्यातल्या गायकानापल्ली गावाजवळ पहाटेच्या सुमारास  एमसीएल-टपोरिया मार्गावर ट्रेलर ट्रक आणि व्हॅन मध्ये झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. दाट धुक्यामुळं दृश्यमानता कमी झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

October 21, 2024 4:21 PM October 21, 2024 4:21 PM

views 8

हिंगोली : दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दोन ठार, एक गंभीर जखमी

हिंगोली जिल्ह्यातल्या पुसेगाव इथे भरधाव गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. गौतम धाबे आणि शेख सत्तार अशी मृतांची नावं आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या बबन धाबे यांना नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   दरम्यान, हिंगोलीत झालेल्या दुसऱ्या एका अपघातात पोलिसांच्या गाडीचा टायर फुटल्याने अपघात होऊन दोन पोलीस अधिकारी आणि चालक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कुरुंदा इथल्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.  

October 8, 2024 7:40 PM October 8, 2024 7:40 PM

views 19

नाशिक आणि अमरावती इथं झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू, दोन जखमी

नाशिक आणि अमरावती इथं आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.  नाशिक इथं कारचं टायर फुटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर अमरावती इथं ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जमावाने ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे.    दरम्यान, नांदेड जिल्ह्यातल्या मसलगा इथं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

October 6, 2024 7:02 PM October 6, 2024 7:02 PM

views 28

चेंबूर आग दुर्घटनेत सात मृत, राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

मुंबईत चेंबूर इथं सिद्धार्थ कॉलनी परिसरात आज पहाटे एका दुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीररीत्या होरपळले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर विजेच्या तारांजवळ शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचं अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी सांगितलं.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासकीय अधिकाऱ्याकडून घटनेची माहिती घेतली. दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य तसेच दोन जखमींच्या उपचाराचा ...

October 3, 2024 3:06 PM October 3, 2024 3:06 PM

views 8

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू

तूळजापूरहून गोणेवाडी इथं देवीची ज्योत घेवून जाणारं चारचाकी वाहन सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती इथं उलटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसंच पाच जण जख्मी झाले आहेत. घटनास्थळी पोचल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. जखमींना नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.