February 16, 2025 7:03 PM February 16, 2025 7:03 PM

views 15

नांदेड वाहन अपघातात ४ जणाचा मृत्यू, १६ जखमी

उत्तर प्रदेशात बाराबंकी इथं पूर्वांचल एक्सप्रेस वे वर आज पहाटे झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. नांदेडहून आयोध्येला जाणाऱ्या भाविकांची ही टेंपो ट्रॅव्हलर गाडी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त बसला धडकून हा अपघात झाला. प्रवाशांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण उपचारादरम्यान मरण पावले. अपघातात मरण पावलेले चौघेही नांदेड जिल्ह्यातले आहेत. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे.

February 15, 2025 1:17 PM February 15, 2025 1:17 PM

views 13

प्रयागराजमध्ये रस्ते अपघातात १० जणांचा मृत्यू, १९ जण जखमी

प्रयागराज जिल्ह्यात कार आणि बसची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण १९ जण जखमी झाले आहेत. छत्तीसगड राज्यातल्या कोरबा इथून प्रयागराज कडे जाणारी गाडी प्रयागराजहून वाराणसीकडे जाणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाल्याचं प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गाबा यांनी सांगितलं.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपघातात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी सदिच्छा समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत...

February 13, 2025 2:36 PM February 13, 2025 2:36 PM

views 10

उत्तरप्रदेशात झालेल्या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू, १६ जखमी

उत्तरप्रदेशात शाहजहांपूर इथं काल रात्री एका गाडीनं दुसऱ्या गाडीला धडक देऊन झालेल्या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले. हे मजूर हरियाणा मध्ये मजुरीसाठी जात होते.  जखमींना फर्रुखाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

February 9, 2025 1:13 PM February 9, 2025 1:13 PM

views 16

मध्यप्रदेशातील अपघातात ३ जणांचा मृत्यू , दहा जण जखमी

मध्यप्रदेशातल्या सतना इथं आज पहाटे झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त मिनी ट्रक भाविकांना प्रयागराज इथं कुंभमेळ्याला घेऊन जात होती.   अपघात झाल्यानंतर सतना - चित्रकुट रस्त्यावर  बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

January 26, 2025 2:46 PM January 26, 2025 2:46 PM

views 8

मध्य प्रदेशात कार अपघातात तीन भाविक ठार

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात पुण्याहून महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज इथं निघालेले तीन भाविक ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर जबलपूर जिल्ह्यात कालादेही इथं वेगात निघालेल्या कारवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.    

January 19, 2025 7:19 PM January 19, 2025 7:19 PM

views 11

बीड जिल्ह्यात एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ आज सकाळी एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू झाला. पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या या तिघांना बीडहून परभणीकडे जाणाऱ्या बसची धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तिघेही घोडका राजुरीचे रहिवासी होते. अपघातानंतर संतप्त जमावानं बस पेटवून दिली. पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचं अर्थसहाय्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं आहे.

January 17, 2025 7:39 PM January 17, 2025 7:39 PM

views 18

पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात ९ जणांचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी एका टेम्पोनं मिनीव्हॅनला दिलेल्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहा वाजता नारायणगावजवळ घडली. ही मिनीव्हॅन नारायणगावच्या दिशेनं जात असताना पाठीमागून टेम्पोनं धडक दिल्यानं ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिकाम्या बसवर आदळली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.   दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.   

January 14, 2025 8:42 AM January 14, 2025 8:42 AM

views 6

नाशिकमध्ये झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी

नाशिकमध्ये द्वारका भागात परवा रात्री झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या आता ७ झाली आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. राज्य शासनानं मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्चही शासनातर्फे करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी पोलीसांनी यासंदर्भात वाहन चालक, मालक आणि स्टील पुरवठादार कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

January 8, 2025 6:58 PM January 8, 2025 6:58 PM

views 8

गुजरातमध्ये झालेल्या अपघातात पालघरच्या तीघांचा मृत्यू, ४ जखमी

पालघरच्या तीन तरुणांचा आज सकाळी गुजरातमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हे तिघेही राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्गा इथे गेले होते. तिथून परतताना वाटेत गुजरात इथे अंकलेश्वर जिल्ह्यात त्यांच्या गाडीला ट्रकची धडक बसून अपघात झाला. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

January 5, 2025 1:55 PM January 5, 2025 1:55 PM

views 19

जम्मू काश्मीरमधे वाहन अपघातात ४ जमांचा मृत्यू, दोघं बेपत्ता

जम्मू काश्मीरमधे किश्तवाड जिल्ह्यात ग्वार मासू परिसरात एका वाहन अपघातात ४ जमांचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता झाले आहेत. घाटातल्या रस्त्यावरुन घसरुन हे वाहन खोल दरीतल्या नदीत कोसळलं. किश्तवाड पोलिसांनी मदतकार्य सुरु केलं आहे. किश्तवाडचे खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.