July 14, 2025 2:30 PM July 14, 2025 2:30 PM

views 12

आंध्र प्रदेश: अन्नमय्या जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातल्या अन्नमय्या जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. राजमपेटहून आंबे घेऊन जाणारा एक ट्रक रेडीपल्ली तलावाच्या कडेला उलटल्यानं ही दुर्घटना घडली.   जखमींना नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

July 12, 2025 8:13 PM July 12, 2025 8:13 PM

views 10

दिल्लीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू

दिल्लीतल्या सीलमपूर इथं आज सकाळी एक चार मजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. पोलीस, एनडीआरएफ आणि स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   दिल्ली सरकारचे मंत्री कपिल मिश्रा यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. इमारतीजवळची गल्ली अरुंद असल्यानं बचावकार्यात अडथळे येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्यांबद्दल समाज माध्यमांतून शोक व्यक्त केला आहे.

May 31, 2025 6:22 PM May 31, 2025 6:22 PM

views 18

पालघरमधे मेंढवन घाटात अपघातात दोघांचा मृत्यू

पालघरमधे मेंढवन घाटात आज कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही कार गुजरातहून मुंबईकडे येत होती. कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने हा अपघात झाला.

May 19, 2025 1:16 PM May 19, 2025 1:16 PM

views 27

मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबईहून देवरुखला जाणारी कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे रत्नागिरीजवळ जगबुडी नदीत कोसळली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

April 30, 2025 4:25 PM April 30, 2025 4:25 PM

views 11

आंध्र प्रदेशात मंदिराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणमजवळ सिंहाचलम मंदिरात आज सकाळी दर्शन रांगेजवळची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. मुसळधार पावसामुळे एक तंबू कोसळल्यानंतर ही भिंत कोसळली. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या बचाव पथकांनी  घटनास्थळी मदत कार्य सुरु केलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं  असून  आंध्र प्रदेशचे गृहमंत्री आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

April 2, 2025 7:45 PM April 2, 2025 7:45 PM

views 9

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात ६ जण ठार

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरालगतच्या शेगाव मार्गावर आज पहाटे तीन वाहनं एकमेकांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात ६ जण जागीच ठार तर २६ जण जखमी झाले आहेत. खासगी बसला ओव्हरटेक करणाऱ्या  बोलेरो कारला समोरून एसटी बस आणि मागून खासगी बसची धडक बसल्यानं हा अपघात घडला.

March 19, 2025 7:43 PM March 19, 2025 7:43 PM

views 11

पुण्याच्या टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू

पुण्याच्या हिंजवडी भागात टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाले. आज सकाळी आठच्या सुमाराला चालकाच्या पायाखाली आग लागली. चालकाने गाडीचा वेग कमी केल्यावर त्याच्यासह पुढे बसलेले कर्मचारी गाडीतून खाली उतरले.   मात्र, दुसऱ्या बाजूचं दार न उघडल्याने इतरांना बाहेर पडता आलं नसल्यानं त्यातल्या काहींचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

March 8, 2025 3:28 PM March 8, 2025 3:28 PM

views 7

बुलडाणा समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, दहा जण जखमी

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या चारचाकीचं टायर फुटल्यानं ती मागून येणाऱ्या कारला धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचलं होतं. या अपघातामुळे मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरली वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

February 20, 2025 1:19 PM February 20, 2025 1:19 PM

views 22

मध्य प्रदेश मघ्ये वाहन अपघातात ३ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातल्या भिंड इथं आज सकाळी दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले. मृत प्रवासी एका लग्नसोहळ्यासाठी जात होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

February 20, 2025 1:16 PM February 20, 2025 1:16 PM

views 14

जौनपूर इथं दोन वेगवेगळ्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या जौनपूर इथं काल रात्री उशीरा झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत.   पहिल्या अपघातात बदलापूर भागात सुल्तानपूर रस्त्यावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या चारचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मृतांमधे 3 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. हे भाविक अयोध्येला जात होते.    दुसऱ्या अपघातात डबल डेकर बसची ट्रकला धडक झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आ...