December 12, 2025 3:32 PM December 12, 2025 3:32 PM

views 11

    वाशीम जिल्ह्यात रात्री झालेल्या गाडी अपघातात दोन जणांचा मृत्यु

    वाशीम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले तर दोन जण जखमी झाले. यवतमाळ इथून शिर्डीकडे जाणाऱ्या एका गाडीने पुढल्या गाडीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. धनज बुद्रुक पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात झाला. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं.

November 22, 2025 3:20 PM November 22, 2025 3:20 PM

views 32

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार ८ जण जखमी

राज्यात दोन वेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमधे ८ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हे सर्व जण सोलापूर जवळच्या कासेगाव-उळे इथून निघाले होते. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं काल रात्री एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीररीत्या जखमी झाले. नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेन...

November 20, 2025 3:04 PM November 20, 2025 3:04 PM

views 38

पुणे-माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

पुणे - माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहे. परवा रात्री ही घटना घडलेल्या या अपघाताची माहिती आज समोर आली.   चालकाचे नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली. या वाहनातल्या तरुणांशी संपर्क होत नसल्यानं त्याच्या पालकांनी शोध सुरू केल्यावर हा अपघात झाल्याचं लक्षात आलं. पोलिस ड्रोनच्या मदतीनं मृतांचा शोध घेत आहेत.

October 18, 2025 8:07 PM October 18, 2025 8:07 PM

views 56

नंदूरबार इथं रस्ते अपघातात ८ जणांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात अस्तंभा यात्रेवरून परतत असलेल्या भाविकांची गाडी चांदशैली घाटात दरीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला घाटातल्या वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली. तळोदा उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी ६ जणांना मृत घोषित केलं, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी या गाडीत ३५ ते ४० भाविक होते.

October 8, 2025 1:38 PM October 8, 2025 1:38 PM

views 56

हिमाचल प्रदेशात बस अपघातात १५ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात बिलासपूर जिल्ह्यात बालूघाट इथं काल संध्याकाळी झालेल्या भूस्खलनात खासगी बसला अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. एक लहान मुलगा बेपत्ता आहे. अपघात झाल्यानंतर तातडीनं मदतकार्य सुरू करण्यात आलं होतं. अपघातग्रस्त बसमध्ये ३० प्रवासी होते.     राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून दोन ...

August 27, 2025 7:57 PM August 27, 2025 7:57 PM

views 4

अफगाणिस्तानात बस अपघात,२५ ठार, २७ जखमी

अफगाणिस्तानात काबूलजवळच्या अरघंडी इथं आज सकाळी एक बस उलटून झालेल्या अपघातात २५ जण ठार तर २७ जण जखमी झाले.   कंधार ते काबूल महामार्गावरची घटना चालकाच्या बेपर्वाईमुळे झाल्याचं अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतिन कानी यांनी म्हटलं आहे.

August 23, 2025 1:05 PM August 23, 2025 1:05 PM

views 15

न्यूयॉर्क स्टेट थ्रूवे इथं एका प्रवासी बसचा अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू

न्यूयॉर्कच्या पश्चिम भागातल्या न्यूयॉर्क स्टेट थ्रूवे इथं एका प्रवासी बसचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नायगारा फॉल्सकडून न्यूयॉर्ककडे जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.   बसमध्ये ५२ प्रवासी होते, काहींना बसमधून बाहेर काढण्यात यश आलं आहे तर काही जण अद्यापही बसमध्ये अडकल्याची भीती आहे.

July 29, 2025 2:46 PM July 29, 2025 2:46 PM

views 11

धुळ्यात एसटी बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू , २२  जण जखमी

महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरच्या दभाषी फाटा येथे आज सकाळी एका एसटी बसला झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून २२  जण जखमी झाले. शिरपूरला हून शिंदखेडा जाणाऱ्या या एसटीला एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना शिरपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातल्या ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना धुळे इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

July 19, 2025 3:26 PM July 19, 2025 3:26 PM

views 10

उत्तर प्रदेशात दोन निरनिराळ्या अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात यमुना एक्स्प्रेस वे इथं आज झालेल्या दोन निरनिराळ्या अपघातांमध्ये किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून इतर १९ जण जखमी झाले आहेत.    यातला पहिला अपघात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाला. यात एक मिनी व्हॅन ट्रकला धडकून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. यानंतर, तासाभरातच दिल्लीहून मथुरेला जाणारी बस उलटून यातून प्रवास करत असलेले सर्व १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

July 17, 2025 1:45 PM July 17, 2025 1:45 PM

views 9

नाशिक इथं झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू, २ जण गंभीर जखमी

नाशिक जिल्ह्यात एक कार आणि मोटारसायकलमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात ३ महिला आणि एक बालकासह ७ जणांचा मृत्यू झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक- दिंडोरी रस्त्यावर काल रात्री अल्टो कार दुचाकीला धडकली आणि दोन्ही वाहनं रस्त्यालगत असलेल्या एका लहान नाल्यात उलटली, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना तातडीनं उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.