March 5, 2025 3:50 PM March 5, 2025 3:50 PM

views 8

विधानसभेतून समाजवादी पार्टीचे अबु आझमी निलंबित

समाजवादी पार्टीचे आमदार अबु असीम आझमी यांना चालू अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याबद्दल आझमी यांना निलंबित करावं असा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेत आझमी यांचं सदस्यत्व विधानसभेच्या पूर्ण कालावधीसाठी रद्द करण्याची मागणी केली. मात्र सदस्यत्व कायमचं रद्द करणं नियमात बसत नसून यासाठी आमदारांची समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं.   काँग्रेस नेते...

March 4, 2025 8:39 PM March 4, 2025 8:39 PM

views 9

विधीमंडळात दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या राजीनाम्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. आझमी यांनी मुघल शासक औरंगजेब याच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याचा आरोप करत सत्ताधारी आमदार महेश लांडगे, अतुल भातखळकर, गुलाबराव पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी केली. गदारोळ वाढल्यामुळे विधानसभा अध्यक्...

March 4, 2025 1:29 PM March 4, 2025 1:29 PM

views 9

आमदार अबू आझमी यांच्याविरोधात FIR दाखल

मुघल शासक औरंगजेबाचा बचाव करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या प्रारंभी मुंबईत पत्रकारांशी बोलताना आझमी यांनी हे वक्तव्य केल्यानं हा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

July 11, 2024 4:23 PM July 11, 2024 4:23 PM

views 12

राज्य सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यावं – आमदार अबू आझमी

राज्य सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यावं, अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी आज विधानसभेत केली. यावर संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही, त्यामुळं मुस्लिमांमधल्या मागास जातींना आरक्षण दिली असल्याची प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.   छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं येत्या १९ जुलै पासून साताऱ्यातल्या सरकारी संग्रहालयात ठेवली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली.