April 24, 2025 7:58 PM April 24, 2025 7:58 PM

views 13

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फवाद खानच्या अबीर गुलाल चित्रपटाला भारतात बंदी

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनित अबीर गुलाल या चित्रपटाच्या प्रदर्शनाला भारतात बंदी घालण्यात आली आहे. आरती बागडी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट पुढच्या महिन्यात ९ तारखेला प्रदर्शित होणार होता.