October 23, 2025 2:49 PM October 23, 2025 2:49 PM

views 158

हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा मशालवाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा मशालवाहक म्हणून निवडण्यात आलं आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी ६ ते २२ फेब्रुवारी या दरम्यान इटलीत मिलान आणि कोर्टिना डी अमपेत्झो इथे होणार आहे. या स्पर्धेसाठी मशालवाहक म्हणून आपली निवड होणं हा आपला सन्मान असल्याची भावना बिंद्रा यांनी आपल्या समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. 

August 11, 2024 10:20 AM August 11, 2024 10:20 AM

views 11

सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान

भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना काल पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला.   ऑलिम्पिक ऑर्डर हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. ऑलिम्पिकमधील योगदानाची दखल घेत अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आलं. बिंद्रानं २००८ बीजिंग इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत १०-मीटर एअर रायफल स्पर्धेत भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकलं होतं. आपल्या कारकिर्दीत १५० हून अधिक...