August 4, 2025 10:21 AM August 4, 2025 10:21 AM
10
कोसानोव्ह मेमोरियल ऍथलेटीक्स स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये भारताच्या अब्दुल्ला अबूबाकरला विजेतेपद
माजी आशियाई पदक विजेता खेळाडू अब्दुल्ला अबूबाकर यानं कोसानोव्ह मेमोरियल ऍथलेटीक्स स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये विजेतेपद पटकावलं. कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 1 सेंटीमीटर लांब उडी मारुन जेतेपद मिळवलं. या विजयामुळे अबूबाकर सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या जागतिक ऍथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे.