January 22, 2025 1:38 PM January 22, 2025 1:38 PM

views 2

अन्नप्रक्रीया उद्योगातली कंपनी एबी इन बेव भारतात २५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार

अन्नप्रक्रीया उद्योगातली कंपनी एबी इन बेव ने भारतात २५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्नप्रक्रीयाउद्योग मंत्री चिराग पासवान यांनी या कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर दावोस इथं जागतिक गुंतवणूकदार परिषदेदरम्यान चर्चा केल्यावर ही माहिती दिली. देशाच्या विविध भागात या प्रकल्पाच्या आस्थापना असतील आणि तो येत्या २ ते ३ वर्षात पूर्ण होईल असं ते म्हणाले. अन्नप्रक्रीया उद्योगात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून त्याने रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. रेल्वेमंत्र...