August 6, 2024 3:49 PM August 6, 2024 3:49 PM
12
पालघर जिल्ह्यात आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा
पालघर जिल्ह्यातल्या नंडोरे इथल्या आश्रमशाळेतल्या मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचं लक्षात आलं आहे. उलटी, मळमळ, यासारखा त्रास झाल्यानं या मुलांना आज पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्ह्यातल्या आणखी काही आश्रमशाळेतल्या मुलांनाही जेवणातून विषबाधा झाल्याचं दिसून आलं आहे. पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी याबाबत माहिती दिली. या मुलांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सध्या ३० मुलं उपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.