July 8, 2025 6:51 PM July 8, 2025 6:51 PM
14
पंढरपुरात एकादशी दिवशी २७ लाखापेक्षा जास्त वारकरी दाखल
यंदा आषाढीवारीतल्या गर्दीनं उच्चांक गाठला असून, पंढरपुरात एकादशी दिवशी २७ लाखापेक्षा जास्त वारकरी दाखल झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे. यंदा ड्रोनच्या माध्यमातून एआय प्रणालीव्दारे जमलेल्या गर्दी विश्लेषण करण्यात आलं. त्यात ही माहिती समोर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.