December 21, 2025 9:25 AM December 21, 2025 9:25 AM

views 5

आसाममध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज खत प्रकल्पाचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालपासून दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नामरूप येथे 12 हजार कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहे. त्याशिवाय ब्रह्मपुत्र नदीत जहाजातून प्रवास करत पंतप्रधान स्थानिक शाळांमधील 25 विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करणार आहेत. त्यानंतर गुवाहाटीतल्या पश्चिम बोरागाव इथं नव्याने उभारण्यात आलेल्या शहिद स्मारक क्षेत्राला भेट देणार आहेत.  प्रधानमंत्र्या...

January 11, 2025 3:05 PM January 11, 2025 3:05 PM

views 12

आसाममधे कोळसा खाणींमधे आणखी एकाचा मृतदेह

आसाममधे दिमा हासो जिल्ह्यातल्या उम्रांग्सो कोळसा खाणींमधे पुराचं पाणी शिरल्यानं मृत्युमुखी पडलेल्या आणखी एका खाणकामगाराचा मृतदेह आज मदतपथकाने बाहेर काढला. केंद्रीय आणि राज्यसरकारी यंत्रणांची मदतपथकं गेले ६ दिवस कार्यरत आहेत.   गेल्या सोमवारी या रॅटहोल खाणींमधे पाणी शिरल्यानं ९ कामगार अडकले होते. यापूर्वी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. या खाणी बेकायदेशीरपणे चालवल्या जात असून या दुर्घटनेसंदर्भात आतापर्यंत २ जणांना अटक झाली आहे.

October 13, 2024 1:46 PM October 13, 2024 1:46 PM

views 11

आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आसाममधील भूकंपाची तीव्रता ४ पूर्णांक २ रिक्टर स्केल इतकी होती. आसामच्या मध्यवर्ती भागात भूकंपाचे केंद्र होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्या लगत असलेल्या उदलगुडी जिल्ह्यात सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपांचे धक्के जाणवले. यात कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याची अद्याप नोंद नाही. तर जम्मू-काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात पहाटे ६ वाजून १४ मिनिटांनी ४ पूर्णांक ३ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे केंद्र गुंडोह येथे...

August 15, 2024 7:50 PM August 15, 2024 7:50 PM

views 6

आसाममध्ये सुरक्षा दलाकडून शोध मोहिम सुरू

बंदी घालण्यात आलेल्या उल्फा या अतिरेकी संघटनेनं २४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्यानंतर आसाममध्ये सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी शोध मोहिम राबवली. राज्यातून कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही. गुवाहाटीमध्ये काही ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्या असून न्याय वैद्यक चाचणीसाठी त्या पाठवल्याची माहिती पोलीस महासंचालक जी. पी. सिंग यांनी दिली. चर्चेतून मुद्दे सोडण्याचे आवाहन मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी उल्फाला केलं आहे.

August 6, 2024 7:33 PM August 6, 2024 7:33 PM

views 4

केरळ आणि आसामला महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १० कोटींची मदत

केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीवित आणि वित्तहानी झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं केरळला १० कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसंच जुलै महिन्यात आसाम राज्यात पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यातून सावरण्यासाठी आसामलाही महाराष्ट्र शासनाकडून १० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

August 4, 2024 10:00 AM August 4, 2024 10:00 AM

views 16

आसाममधील मोरीगाव इथं 27 हजार कोटी रुपयें गुंतवणुकीनं सेमीकंडक्टरचा कारखाना

आसाममधील मोरीगाव इथं टाटाच्या सेमीकंडक्टर युनिटचे बांधकाम सुरू झालं आहे असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत याबद्दल अधिक माहिती देताना वैष्णव म्हणाले की, या एककामध्ये 27 हजार कोटी रुपयें गुंतवणूक केली जाईल आणि 15 हजार प्रत्यक्ष आणि 11 ते 13 हजार अप्रत्यक्ष नोकरीच्या संधी निर्माण होतील. या भव्य सेमीकंडक्टर कारखान्यातून दररोज चार कोटी 83 लाख सेमीकंडक्टर चिप्स तयार होणार आहेत. या चिप्सचा वापर ईलेक्टीक वाहनं, दळणवळण आणि संजालांच्या पाया...