February 25, 2025 1:33 PM February 25, 2025 1:33 PM

views 9

दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ‘आप’च्या १२ आमदारांचं निलंबन

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या अभिभाषणाच्या वेळी घोषणाबाजी केल्यामुळे विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पार्टीच्या बारा आमदारांना विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी आज निलंबित केलं. गोपाल राय, वीर सिंग धिंगन, मुकेश अहलावत, चौधरी झुबैर अहमद, अनिल झा, विशेष रवी आणि जरनैल सिंग यांचा निलंबन झालेल्या आमदारांमधे समावेश आहे. त्यानंतर निलंबित आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात निदर्शनं केली. मुख्यमंत्री कार्यालयातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र काढून भाजपा सरकारने त्यां...

December 15, 2024 8:30 PM December 15, 2024 8:30 PM

views 7

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आमआदमी पक्षाची चौथी यादी जाहीर

आम आदमी पक्षाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना कालकाजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.  आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज यांना  ग्रेटर कैलाश मतदारसंघातून ,गोपाल राय यांना बाबरपूर मतदारसंघातून आणि इम्रान हुसेन यांना बल्लीमारन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

November 18, 2024 2:46 PM November 18, 2024 2:46 PM

views 5

आम आदमी पार्टीचे कैलाश गहलोत यांचा भाजपात प्रवेश

दिल्लीच्या आम आदमी पार्टी मंत्रिमंडळाचे माजी सदस्य कैलाश गहलोत यांनी आज भाजपामधे प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहरलाल, पक्ष उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांचं स्वागत केलं. आम आदमी पार्टीच्या धारणांपेक्षा राजकीय महत्त्वाकांक्षा वरचढ होत असल्याच्या कारणावरुन गहलोत यांनी कालच पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

September 12, 2024 1:30 PM September 12, 2024 1:30 PM

views 9

हरियाणातल्या विधानसभा निडवणुकीसाठी आम आदमी पार्टीकडून आज दोन याद्या जाहीर

 हरियाणातल्या आगामी विधानसभा निडवणुकीसाठी आम आदमी पार्टीने आज दोन याद्या जाहीर केल्या असून यात २२ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात प्रेम गर्ग हे पंचकुला मतदारसंघातून, कमल बिसला फतेहबादमधून, केतन शर्मा अंबालामधून आणि धीरज कुंदु दादरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. नूह इथून रबिया किडवई, तर जगधरीमधून आदर्शपाल गुज्जर निवडणूक लढवणार आहेत. तर काल जाहीर केलेल्या पाचव्या यादीत नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात अनिल रंगा, दलजित सिंह, कौशल शर्मा यांच्या नावांचा समावेश आहे.