September 6, 2024 9:55 AM September 6, 2024 9:55 AM
7
गौरी-गणपती सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध
आगामी गौरी-गणपती सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातल्या वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतल्या केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा देण्यात येतो. पात्र शिधापत्रिका धारकांनी हे शिधासंच हस्तगत करावेत, असं आवाहन परभणीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयानं केलं आहे.