March 1, 2025 11:20 AM March 1, 2025 11:20 AM
10
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळातील अहवाल उघड
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनावरील भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोविड काळात निधीचा कमी वापर, प्रकल्प अंमलबजावणीतील विलंब आणि शहरातील रुग्णालयांमध्ये औषधे आणि कर्मचाऱ्यांची कमतरता हे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेत सादर केलेल्या अहवालात मागील सरकारनं कोविड काळात केंद्राकडून मिळालेल्या सुमारे 788 कोटींपैकी सुमारे 543 कोटी रु...