March 15, 2025 2:42 PM March 15, 2025 2:42 PM

views 5

प्रधानमंत्री मोदी ३० मार्चला ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा १२० वा भाग असेल.   नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या २८ मार्च पर्यंत १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, तसंच प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनल वरून मन-की-बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असून त्यानंतर लगेचच ...

November 30, 2024 11:50 AM November 30, 2024 11:50 AM

views 9

प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांची चंदीगढ च्या दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राला भेट

प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी काल चंदीगढ च्या दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राला भेट दिली. दोन्ही ठिकाणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सेहगल यांनी माध्यम संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आकाशवाणी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेला चालना देण्याचा संदेश सेहगल यांनी यावेळी दिला. आकाशवाणीला अधिक प्रभावी आणि लवचिक संस्था बनवण्याच्या गरजेवर त्यांनी यावेळी भर दिला.

November 3, 2024 6:36 PM November 3, 2024 6:36 PM

views 8

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आकाशवाणीच्या कार्यालयाबाहेर स्फोट

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आकाशवाणीच्या कार्यालयाबाहेर रविवारच्या बाजारात झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात किमान १० नागरिक जखमी झाले. हाती आलेल्या माहितीनुसार टीआरसी क्रॉसिंग भागात दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या वाहनांच्या दिशेनं एक ग्रेनेड फेकला, मात्र त्यांचा नेम चुकल्यानं तो रस्त्यावर फुटला. पोलिसांनी या भागात नाकेबंदी करून आरोपींना शोधण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस महासंचालक नलीन प्रभात आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या हल्ल्याबाबत चर्चा केली ...

June 29, 2024 3:42 PM June 29, 2024 3:42 PM

views 5

पंतप्रधान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम ऐकता येईल.