December 20, 2025 7:17 PM December 20, 2025 7:17 PM
16
भाजपा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबत असल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप
भारतीय जनता पक्ष सत्तेत राहण्यासाठी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात केला. भाजपा धर्माचं आणि भाषेचं राजकारण करत आहे, विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबत आहे, याच्या विरोधात नागरिकांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन त्यांनी केलं. पुण्यात सुरू असलेल्या विकासकामांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पुणे महानगरपालिकेसह राज्य आणि केंद्रातही भाजपाचं सरकार असतानाही पुणे विमानतळाचा विकास अद्याप प्रलंबित असल्यावरून त्यांनी ...