October 20, 2025 7:48 PM October 20, 2025 7:48 PM

views 30

आदि कर्मयोगी अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार

 आदि कर्मयोगी अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत  आज पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार म्हणजे पालघर जिल्ह्यातल्या  आदि कर्मयोगी, आदि सहयोगी तसंच आदि साथी यांनी केलेल्या अथक परिश्रमांचं फळ आहे. हा सन्मान पालघर जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकास कार्याची, विशेषतः आदिवासी भागांच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची  पोचपावती ठरला आहे. 

October 18, 2025 9:24 AM October 18, 2025 9:24 AM

views 54

आदि कर्मयोगी अभियानात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार

देशातल्या प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने आदिकर्मयोगी अभियान सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल आयोजित करण्यात आलेल्या 'आदि कर्मयोगी अभियान' या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेला त्या संबोधित करत होत्या. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समुदाय, राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवासात सहभागी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 'धरती आबा जनभागीदारी अभियाना'त सर्वोत्कृष्ट राज्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला अस...