December 6, 2025 2:42 PM December 6, 2025 2:42 PM

views 11

न्यायालयीन प्रक्रियेत कोणतंही तंत्रज्ञान न्यायालयीन निर्णय प्रक्रियेची जागा घेऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

न्यायालयीन प्रक्रियेत एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत जपून पावलं टाकली जात असून अशा प्रकारचं कोणतंही तंत्रज्ञान न्यायालयीन निर्णय प्रक्रियेची जागा घेऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयीन प्रक्रियेत एआय आणि मशिन लर्निंगचं नियमन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती, तेव्हा ही टिप्पणी करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या बाबतीत न्यायव्यवस्था सावध आहे, न्यायालयीन निर्णय प्रक्...

August 14, 2025 12:46 PM August 14, 2025 12:46 PM

views 6

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या याचिकेला विरोध दर्शवल्यानंतर, सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या पीठानं जम्मू-काश्मीरमधल्या सद्यस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं सांगून पहलगाम दहशतवादी हल्ल्यांकडे लक्ष वेधलं. या याचिकेवर पुढची सुनावणी आठ आठवड्यांनंतर होणार आहे.

October 1, 2024 2:55 PM October 1, 2024 2:55 PM

views 4

आयआयटी धनबाद इथं प्रवेश नाकारला गेलेल्या दलित विद्यार्थ्याला याच संस्थेत प्रवेश देण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दिले निर्देश

आयआयटी धनबाद इथं प्रवेश शुल्क भरायला काही मिनिटं उशीर झाला म्हणून प्रवेश नाकारला गेलेल्या दलित विद्यार्थ्याला याच संस्थेत प्रवेश देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर या प्रकरणी काल सुनावणी झाली. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश द्यावा, तसंच सर्व सुविधा द्याव्यात असं न्यायालयाने सांगितल...