February 24, 2025 8:56 AM February 24, 2025 8:56 AM
3
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप
राज्य सरकार सीमा भागातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज दिल्ली इथं आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील पवार यांनी दिली दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांना बोलता भेटता यावं यासाठी स्थान निर्माण केलं जाईल, त्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल, असं पवार यांनी सांगितलं. त...