October 29, 2025 9:30 AM

views 34

आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता

आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींनाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली असून, अठरा महिन्यांच्या आत आयोग शिफारशी करेल. याचा लाभ 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. विविध मंत्रालयं, राज्य सरकारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या संदर्भ अटी निश्चित केल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

January 17, 2025 9:46 AM

views 102

आठव्या वेतन आयोगाची स्थापना करायला केंद्र सरकारची मंजुरी

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याच्या शिफारशी 2026 पासून लागू होतील. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे. तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारसी प्राप्त होतील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं.   आयोगाचे अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नेमणूक लवकरच होईल, असंही ते म्हणाले. श्रीहरीकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरं लाँच पॅड उभारायलाही केंद्रीय ...