October 16, 2024 12:02 PM
9
आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ आणि जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद अर्थात आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. ही परिषद भारत मंडपम इथं होत आहे. यामध्ये सहभागी उद्योगक्षेत्रातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया बाबतच्या दृष्टीकोनाची प्रशंसा केली. “तिसऱ्या कार्यकाळामध्ये पंतप्रधानांनी इंडियन मोबाइल काँग्रेस (आयएमसी) ला नाविन्यपूर्ण आण...