July 31, 2025 2:39 PM July 31, 2025 2:39 PM
9
मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीची ८ किलो अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून आलेल्या दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली. एका प्रकरणात तीन प्रवाशांकडून तब्बल दोन किलो तर दुसऱ्या प्रकरणात बँकॉकहूनचं आलेल्या इंडिगोच्या एका प्रवाशाकडून ६ किलो वीड जप्त करण्यात आलं. या चौघांनाही अटक करण्यात आली आहे.