August 15, 2024 4:07 PM August 15, 2024 4:07 PM
13
राज्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
राज्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्य शासन राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ ...