January 15, 2025 3:14 PM January 15, 2025 3:14 PM
17
७७व्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेनादलाला अभिवादन
सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. भारतीय लष्कराचं सैनिकांचं शौर्य, बांधिलकी आणि मातृभूमीची सेवा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. याच दिवशी १९४९मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती. या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन साजरा केला जातो. लष्कर दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्करातले जवान आणि ज्येष्ठ तसंच निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत...