January 27, 2025 1:32 PM January 27, 2025 1:32 PM

views 4

७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशोदेशीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

देशाच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही घटना दोन्ही देशांमधलं धोरणात्मक सहकार्य आणि दीर्घ मैत्रीचं प्रतीक होतं, असं मोदी यांनी मॅक्रॉन यांच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टला उत्तर देताना म्हटलं आहे. आयर्लंडचे प्रधानमंत्री मायकल मार्टिन यांनी समाजमाध्यमावर दिलेल्या शुभेच्छा संदेशालाही प्रधानमंत्र्यांनी उत्तर ...

January 26, 2025 7:26 PM January 26, 2025 7:26 PM

views 12

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत ध्वजारोहण संपन्न

७६वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहानं देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा ध्वज फडकावला. देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली. देशाची विविधता आणि सांस्कृतिक एकात्मता दाखवणारे १६ विविध राज्यांचे तसंच इतर मंत्रालयांचे मिळून ३१ चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म...

January 26, 2025 6:55 PM January 26, 2025 6:55 PM

views 9

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक देश म्हणून भारत ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे, असं सांगून राज्यघटना तयार करणाऱ्या सर्वांना त्यांनी अभिवादन केलं. भारताचा हा प्रवास लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकता या तत्त्वांच्याच आधारावर झालेला आहे, असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. या निमित्ताने राज्यघटनेच्या मूल्यांची जपणूक करण्याची आणि एक कणखर आणि समृद्ध भारत घडवण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

January 26, 2025 2:36 PM January 26, 2025 2:36 PM

views 17

७६वा प्रजासत्ताक दिन विविध देशांमध्येही साजरा

भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन आज विविध देशांमध्येही साजरा होत आहे. बांगलादेशात राजधानी ढाका इथं भारतीय उच्चायुक्तालयात प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बांगलादेशातले भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी तिरंगा ध्वज फडकावला. या सोहळ्यात भारतीय समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी देशभक्तीपर गीतंही सादर केली. श्रीलंकेत राजधानी कोलंबो इथंही भारतीय उच्चायुक्तालयात आणि इतर राजनैतिक कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. भारताचे उच्चायुक्त डॉ. सत्यजल पा...

January 25, 2025 8:00 PM January 25, 2025 8:00 PM

views 10

प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी देशभर जय्यत तयारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यासह देशभर सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नवी दिलीत कर्तव्य पथ इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या होणार असलेल्या संचलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संविधान स्वीकृतीची ७५ वी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात आला आहे.   इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो उद्याच्या संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारताच्या सशस्त्र दलांसोबत इंडोनेशियाची १६० सदस्यीय संचलन तुकडी आणि १९०...

January 25, 2025 3:18 PM January 25, 2025 3:18 PM

views 12

प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळ्यात ९४२ कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान करण्यात येणार

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पोलिस, गृहरक्षक दल, अग्निशमन, आणि नागरी सेवांसह इतर सुरक्षा सेवांमधल्या ९४२ कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. यापैकी, ९५ कर्मचाऱ्यांना आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. १०१ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकं तर ७४६ कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवा पदकं बहाल केली जाणार आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. नांदेड पोलीस नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्ष...

January 16, 2025 8:23 PM January 16, 2025 8:23 PM

views 10

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे. सुमारे ४० विमानं कर्तव्यपथावर विविध कसरतींचं प्रदर्शन करतील. यंदा मिग २९, राफेल, सुखोई ३०, जग्वार, अपाचे,  C-130 आणि C - 17 यासारखी लढाऊ विमानं सादरीकरणात भाग घेतील.    याशिवाय हवाई दलाची एक तुकडी सुद्धा कर्तव्यपथावर प्रदर्शन करेल. १४८ जवानांच्या या तुकडीचं नेतृत्व स्कान्ड्रन लीडर महेंद्र सिंह  हे करणार आहेत.  

January 16, 2025 8:19 PM January 16, 2025 8:19 PM

views 16

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी

७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत. २५ आणि २६ जानेवारी रोजी ते भारत दौऱ्यावर येतील. ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. या भेटीत दोन्ही देशांच्या संबंधावर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.