June 24, 2025 3:36 PM
20
अंदाज समित्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप
केंद्र आणि राज्य सरकारकडून कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च वाढत असल्याने संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची जबाबदारी वाढली असून या समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने जबाबदारीचं पालन करावं असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात केलं. अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. देशावरील कर्जाचा भार पाहता जन कल्याणासाठी अधिक खबरदारीने खर्च करण्याची गरज आहे. त्यात या समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचे ते म्हणाले. संसदी...