December 17, 2024 1:17 PM December 17, 2024 1:17 PM
12
भारत लोकशाहीची जन्मभूमी आहे – मंत्री जगतप्रकाश नड्डा
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेतल्या चर्चेला आज पुन्हा सुरुवात झाली. सभागृहाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आपल्या भाषणात सांगितलं की भारत केवळ जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असं नव्हे तर लोकशाहीची जन्मभूमी देखील आहे. भारतीय संस्कृती आणि परिसंस्थेत स्वातंत्र्य, समता आणि समावेशन तसंच नागरिकांना सन्मानाने जगण्याची संधी ही लोकशाही तत्वं मुळापासून रुजली आहेत असं ते म्हणाले.