October 8, 2024 8:33 PM October 8, 2024 8:33 PM
6
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान
चित्रपटसृष्टीतल्या सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने आज ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाला. ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपतींनी इतरही कलाकार आणि चित्रपटांना सन्मानित केलं. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि इतर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मिथुन चक्रवर्ती यांचं अभिनं...