October 10, 2024 4:32 PM October 10, 2024 4:32 PM
8
६८व्या धम्मप्रवर्तन दिन कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ
नागपूर इथं पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने ६८व्या धम्मप्रवर्तन दिन कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ होत आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत भिक्खू संघ, उपासक तसंच श्रामणेर यांना दीक्षा देण्या आली. उद्या ११ ऑक्टोबरला पंचशील ध्वजारोहण तर शनिवारी सायंकाळी धम्मप्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.