September 15, 2024 8:16 PM September 15, 2024 8:16 PM

views 13

दूरदर्शनची ६५ वी गौरवरशाली वर्षपूर्ती

देशातील प्रसारणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेलं दूरदर्शन आज आपली ६५  गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. १५  सप्टेंबर १९५९ रोजी स्थापन झालेल्या दूरदर्शनने भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्या दिवशी दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणाचं उद्घाटन केलं होतं. १९७५  पर्यंत दूरदर्शन आकाशवाणीचाच घटक होता. १ एप्रिल १९७६  रोजी, त्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका स्वतंत्र विभागात रूपांतर झालं आणि  ते प्रसार भारती अंतर्गत आलं. सरकारचं स्वायत्त सार्वजनिक सेवा प्रसारक ...