September 8, 2025 3:20 PM September 8, 2025 3:20 PM

views 13

मणिपूरमध्ये काल 6 दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी काल वेगवेगळ्या दहशतवादी गटांच्या सहा दहशतवाद्यांना अटक केली. पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलाने शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा जप्त केला. त्यात रायफल्स, रिव्हॉल्वर, स्फोटकं आणि इतर दारुगोळ्याचा समावेश आहे. तसंच, पूर्व इम्फाळ जिल्ह्यात खाबम लामखाई इथून ५० किलो गांजासह दोघांना अटक करण्यात आली.