July 20, 2024 1:42 PM July 20, 2024 1:42 PM
13
जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचं नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
जागतिक वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक आँड्रे अझौले आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वारिष्ट अधिकारी तसंच विविध देशातले सांस्कृतिक मंत्री, राजदूत आणि डोमेन तज्ञ उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या माध्यमातून भारताचा अद्वितीय सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जगासमोर येईल, असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री राजेंद्र सिंह शेख...